Ad will apear here
Next
करोनासंदर्भात राज्यातील सर्व प्रकारच्या अधिकृत, एकत्रित माहितीसाठी सरकारची वेबसाइट : महाइन्फोकरोना


मुंबई :
करोना विषाणूचा संसर्ग राज्यात फैलावतो आहे, त्याप्रमाणेच अफवा, खोट्या बातम्याही समाजमाध्यमांद्वारे पसरत आहेत.  म्हणूनच नागरिकांना करोनाच्या संदर्भातील सर्व प्रकारच्या सरकारी उपाययोजनांची अधिकृत माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी, म्हणून राज्य सरकारच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने पुढाकार घेतला आहे. महासंचालनालयाने https://www.mahainfocorona.in या वेबसाइटची निर्मिती केली आहे. येथे मराठीत सर्व माहिती उपलब्ध आहे.

कोविड -१९ या संसर्गजन्य साथीच्या रोगाची राज्यात सध्या काय स्थिती आहे, कोविड-१९ अर्थात करोना विषाणूविषयीची खरी माहिती, करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व बाधितांवर उपचारासाठी राज्य शासन करत असलेली कार्यवाही, करोना आजारापासून मुक्ती मिळालेल्यांची माहिती, लॉकडाउनमुळे अडचणीत असलेल्या नागरिकांसाठी कुठे-कुठे कॅम्प उभारले आहेत, वेगवेगळ्या जिल्ह्यांत जिल्हा प्रशासनाने केलेल्या उपाययोजना ही सर्व अधिकृत व खात्रीशीर माहिती आता एका क्लिकवर एकत्रितरीत्या मिळणार आहे. 

जगभरासह देशात व राज्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. या विषाणूचा संसर्ग वाढू नये, यासाठी केंद्राबरोबरच राज्य शासन विविध उपाय योजत आहे. त्याचबरोबर करोनाबाधितांची योग्य ती काळजी घेऊन रुग्णांना बरे करण्यासाठी राज्याची आरोग्य यंत्रणा अविरत झटत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह मंत्रिमंडळातील सर्व मंत्री आपापल्या विभागामार्फत राज्यातील जनतेची काळजी घेत आहेत. या सर्वांची माहिती प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमे, तसेच सर्वसामान्य नागरिकांपर्यंत योग्य रितीने पोहोचणे आवश्यक आहे. समाजमाध्यमांद्वारे अनेकदा चुकीची माहिती पसरते आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये विनाकारण भिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण होते. म्हणूनच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने या वेबसाइटची निर्मिती केली आहे. 

या वेबसाइटवर कोविड-१९ची सर्वसाधारण माहिती दिली आहे. हा रोग कसा होतो, करोना संसर्गापासून बचावासाठी काय काळजी घ्यावी, करोनाच्या प्रतिबंधासाठी कोणकोणते प्रयत्न केले जात आहेत, ही माहिती येथे आहे. करोनाबाधितांची जिल्हानिहाय रोजची आकडेवारी इन्फोग्राफिकसह येथे दिली जाते. त्याचबरोबर राष्ट्रीय कॉल सेंटर व राज्यस्तरीय नियंत्रण कक्षाचे क्रमांकही देण्यात आले आहेत. जिल्हानिहाय हेल्पलाइनचे क्रमांकही या ठिकाणी देण्यात आले आहेत. सार्वजनिक सुविधा या विभागात प्रत्येक जिल्ह्यात कोणकोणत्या सोयीसुविधा केल्या आहेत, त्याची जिल्हानिहाय सविस्तर माहिती देण्यात आली आहे.  

‘घडामोडी’ या विभागात राज्य शासनाच्या विविध विभागांनी घेतलेले निर्णय, जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी, मुख्यमंत्री, इतर मंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्या पत्रकार परिषदांची व बैठकांची माहिती, राज्यात घडणाऱ्या ठळक घडामोडी आदींची माहिती देण्यात आली आहे. माध्यमांना लवकरात लवकर माहिती मिळावी, यासाठी हा विभाग वेळोवेळी अद्ययावत केला जाणार आहे. 

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने ट्विटर आणि फेसबुकवर देण्यात येणाऱ्या माहितीची लिंकही येथे देण्यात आली आहे. ‘विश्लेषण’ या विभागात राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या वतीने करोना प्रादुर्भावाच्या राज्यातील स्थितीच्या विश्लेषणात्मक माहितीचा अहवाल देण्यात आला आहे. ही माहिती तेथून डाउनलोडही करता येणार आहे. 

करोनाविरुद्धच्या लढ्यात सहभागी होण्यासाठी ‘मुख्यमंत्री सहायता निधी-कोविड १९’च्या खात्याची माहितीही येथे देण्यात आली असून, या खात्याचा क्यूआर कोडही येथे देण्यात आला आहे, जेणेकरून इच्छुकांना थेट मदत देता येईल. 

करोनाविरुद्धचा लढा जिंकण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांची अधिकृत व खात्रीशीर माहिती मिळण्यासाठी https://mahainfocorona.in या वेबसाइटला भेट देण्याचे आवाहन राज्य सरकारच्या वतीने करण्यात आले आहे.
 
Feel free to share this article: https://www.readingwall.com/P/NZWFCL
Similar Posts
‘अंतर’भान! आज लोकांमधील शारीरीक अंतर वाढले आहे. ती अपरिहार्यता आहे. पण त्यामुळे मनांमधील अंतर वाढणार नाही याची काळजी घेतली गेली पाहिजे. तरच, ‘अंतर’भान जागे आहे, असे म्हणता येईल.
महाराष्ट्र लॉकडाउन; अधिसूचना जारी; असे आहेत नियम... मुंबई : कोविड-१९ (कोरोना विषाणू) प्रसार रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा भाग म्हणून विविध कायद्यांतर्गत उपलब्ध असलेल्या अधिकारांचा उपयोग करून संपूर्ण महाराष्ट्रात ३१ मार्च २०२०पर्यंत बंदी आदेश लागू करण्याची अधिसूचना मुख्य सचिव अजोय मेहता यांनी जारी केली आहे.
करोनाशी लढण्यासाठी, नव्याने उभे राहण्यासाठी कल्पना सुचवा; उत्तम कल्पनांना बक्षिसे सध्या सारे जग करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संकटात सापडले आहे. सारे देश आपापल्या परीने या संकटाचा सामना करीत आहेत. भारताचा लढा जगासमोर नवे आदर्श निर्माण करीत आहे. या महामारीच्या पहिल्या तडाख्यात सारे जण हतबुद्ध झाले होते; पण आता या संकटाच्या विविध पैलूंवर सुसंगत विचार पुढे यायला लागले आहेत. या संकटाशी
‘आमचा करोनामुक्तीचा अनुभव’ करोनाचे संकट आता अगदी आपल्या दारापर्यंत आले आहे आणि काही जणांच्या घरात ते येऊनही गेले असेल. तीव्र लक्षणे नसतील, तर होम क्वारंटाइन राहून आणि डॉक्टरी सल्ल्याचे पूर्ण पालन करून या संकटातून सहीसलामत बाहेर पडता येते. घाबरून न जाता केवळ पाळायला हवा तो संयम. ही गोष्ट आहे पुण्यातील अशाच एका दाम्पत्याची, ज्यांचा

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language